आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या श्री गणेशाचे विसर्जन पर्यावरण पुरक पध्दतीने करण्यात आले..
अमळनेर
शाडु मातीच्या श्री गणेशाची मुर्ती स्थापन करण्यात आली होती .. हे वर्ष ३ रे ..आज अनंत चतुर्थीला अतिशय साध्या पध्दतीने आरती करून कुठलेही वाद्यं न लावता गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षी लौकर या घोषणा देत आमदार कार्यालया बाहेरील जागेत खड्डा करून त्यात पाणी व गोमुत्राचा वापर करून विसर्जन करण्यात आले व त्यानंतर त्याच खड्ड्यात मित्र परीवाराने वटवृक्ष देखील लावले …
यावेळी नगरपरिषदेचे आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी चे गटनेते प्रविण पाठक जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री पंकज चौधरी श्री सुनिल भामरे, श्री धनुभाऊ महाजन,श्री किरण बागुल,श्री साखरलाल महाजन सर ,श्री मनोज शिगांणे,श्री रोशन सोनवणे,अनिल मराठे ,किशोर मराठे,गुलाब आगळे ,सुनिल तिरमाळे,महेश चौधरी,उमेश चौधरी,राजु चौधरी ,संतोष लोहार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…आपली श्री गणेश मुर्ती शाडु मातीची असुन बाहेरील बाजूस एका खड्ड्यात विसर्जन करून त्याठिकाणी वृक्ष लावण्याचा व कुठलाही बडेजाव पणा न करता.. *कार्यसम्राट आमदार श्री शिरीषदादा चौधरी व सौ अनिताताई चौधरी यांचा संकल्प होता..*








