Dhule

मध्यप्रदेशच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकुर यांनी आदिवासींच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या सामजिक हक्कासाठी संघटना ना अपमानित करण्याबाबत निषेध

मध्यप्रदेशच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकुर यांनी आदिवासींच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या सामजिक हक्कासाठी संघटना ना अपमानित करण्याबाबत निषेध

धुळे राहुल साळुंके

मध्यप्रदेशच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकुर यांनी आदिवासींच्या हक्क अधिकारासाठी संविधानिक पद्धतीने लढणाऱ्या सामजिक हक्कासाठी जमिनी स्तरावर लढणाऱ्या व आदिवासी समाजात सामाजिक क्रांती आणणाऱ्या जय आदिवासी युवा शक्ति (जयस) ला एक देशद्रोही संघटना म्हणून अपमानीत केले होते. ह्याचे पडसाद आता आदिवासी बहुल प्रदेशात होत आहे.कारण जयस ही आदिवासी संघटना आहे संपूर्ण भारतात आदिवासी बहुल भागामध्ये आहे अन् त्यामुळे आदिवासींमधे नाराजी व उद्रेक होणे स्वाभाविक आहे.
आज देशभरात जयस व विविध आदिवासी संघटनानी मिळून देशव्यापी विरोध प्रदर्शन व निवेदने देऊन करत असल्याने आज शिरपुर तालुक्यातील सांगवी पोलिस स्टेशन येथे निवेदन देवून विरोध प्रदर्शन करण्यात आले.
ह्यावेळी दिनेश सी.पावरा, भूपेश पावरा, इंदास पावरा, दारासिंग पावरा, सूरज पावरा, मुकेश पावरा, शिवम पावरा, सत्तरसिंग पावरा, शिवाजी पावरा, गुलाब पावरा, गरमसिंग पावरा आदि आदिवासी युवक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button