सामाजिक उपक्रमातूनही ममता जोपासण्याचे कर्तव्य : ह भ.प. बानगुडे
प्रतिनिधी पंढरपूर रफिक अत्तार
आपण समजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपल्या सुख दुखाःच्याप्रसंगी सामाजिक उपक्रम राबविण्याचे कर्तव्य करणारी समाजासाठी आर्दशवत असतात. हीच भुमिका घेत आपल्या मुलाच्या पुण्यस्मरणानिमीत विविध उपक्रम घेवून सामाजिक उपक्रमातूनही ममता जोपासण्याचे कर्तव्य कोरके परिवाराने पार पाडले आहे. असे प्रतिपादन ह.भ.प गोपीनाथ बानगुडे महाराज यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील श्री. रेणुकादेवी पतसंस्थेचे चेअरमन महेशकुमार कोरके यांचे चिरंजीव पै. कै. अभिजीत (सोनू) कोरके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित केलेल्या कीर्तनसेवेप्रसंगी ह.भ.प. बानगुडे महाराज बोलत होते. पुढे बोलताना महाराजांनी उपस्थितांचे प्रबोधन करून आपल्या कार्यातून सामाजिक व धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी बॅक आॅफ बडोदा पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक दत्तात्रय राऊत, माजी नगरसेवक रमेश शिरसट, पै. अस्लम काझी, विठ्ठलचे संचालक भगिरथ भालके, युवराजदादा पाटील,माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव पापरकर, संचालक माणिकराव मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे महारुद्र पाटील, डॉ अनिल राजमाने, डॉ. सुळे, दिनेश भोसले, राहुल मगर, विजय पाटील, सुभाष चव्हाण, बाबासाहेब ताड, राजेंद्र अवताडे, निर्मला पाटील, दिलीपराव चव्हाण, युवा नेते जीवन पाटील, वसंत चव्हाण, पै. महादेव चव्हाण, शहाजी चव्हाण, डॉ हनुमंत चव्हाण, अॅड विजय चव्हाण, वसुदादा चव्हाण, दिपक चव्हाण, लक्ष्मण आंबुरे, गणेश लटके, संजय पाटील यांच्यासह कोरके परिवार व मित्र परिवार उपस्थित होते.
तसेच या पुण्यस्मरणानिमीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करुन अभिजीत कोरके यांना अभिवादन केले. तर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करुन याद्वारे अभिजीत यांच्या आठवणी जोपासण्याचा संकल्प केला. त्याचप्रमाणे यावेळी येथील श्री नागनाथ मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही देण्यात आले. अशाप्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून पै. कै. अभिजीत कोरके यांचा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला.
फोटो ओळी : अभिजीत कोरके यांच्या पुण्यस्मरणानिमीत वृक्षारोपण करताना मान्यवर





