Amalner

अमळनेरात भा ज प च्या रेखा पाटील सभापती तर भिकेश पाटील उपसभापती पदी विराजमान

अमळनेरात भा ज प च्या रेखा पाटील सभापती तर भिकेश पाटील उपसभापती पदी विराजमान

अमळनेर
येथील पंचायत समिती अमळनेर ची सभापती उपसभापती निवड दि 2 रोजी पार पडली असून यात भारतीय जनता पार्टीचा एकतर्फीच विजय झाला.
अमळनेर पंचायत समितीच्या आज झालेल्या निवडणुकीत संख्याबळ भा ज प 5 सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस 3 सदस्य अशी असतांना राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत भा ज प मध्ये प्रवेश केला होता.पण ते परत राष्ट्रवादीत असल्याचे स्पष्ट केले.आज झालेल्या 8 सदस्यीय पं स मध्ये भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.त्यानुसार भारतीय जनता पक्षातर्फे सभापती पदासाठी जानवे गणातील रेखा नाटेश्वर पाटील यांनी 2 अर्ज उपसभापती पदासाठी मुडी गणातील भिकेश पावबा पाटील यांनी 2 अर्ज दाखल केले होते.त्या व्यतिरिक्त कोणीही विरोधात अर्ज दाखल न केल्याने पीठासीन अधिकारी तथा तहसिलदार मिलिंद वाघ यांनी बिनविरोध निवड घोषित केली.यावेळी माजी सभापती वजाबाई भिल,माजी उपसभापती त्रिवेणी बाई पाटील,सदस्य कविता पाटील,राष्ट्रवादीचे विनोद पाटील,प्रवीण पाटील,निवृत्ती बागुल उपस्थित होते.
यावेळी पीठासीन अधिकारी मिलिंद वाघ यांना प्रभारी गट विकास अधिकारी ए बी राणे,कक्ष अधिकारी के टी पाटील,अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर,अव्वल कारकून नितीन ढोकने, वरिष्ठ सहाय्यक देवेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.
यावेळी भा ज प तर्फे मार्केट सभापती प्रफुल्ल पाटील,शीतल देशमुख,श्याम अहिरे,श्रीनिवास मोरे,नाटेश्वर पाटील,मच्छिंद्र पाटील,जिजाबराव पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button