Chopda

श्री सुदर्शन महाजन यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्कार

श्री सुदर्शन महाजन यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्कार .

लतीश जैन

चोपडा : माजी राष्ट्रपती ,शिक्षण तज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे COVID-19 च्या काळामध्ये ज्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले अशा शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात प्रताप विद्या मंदिर,चोपडा येथे कार्यरत श्री.सुदर्शन नारायण महाजन यांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्काराची घोषणा आय. ए. एस. मा. बी. जी. वाघ साहेब ,माजी जिल्हाधिकारी तथा महसूल उपायुक्त, विचारवंत, साहित्यिक (नाशिक) यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला .

प्रसंगी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.विठ्ठलदास गुजराथी , उपाध्यक्ष श्री. देसाई नाना, चेअरमन श्री.राजाभाई मयूर, सेक्रेटरी माधुरीताई मयूर,श्री .चंद्रहासभाई गुजराथी,संस्था समन्वयक श्री.गोविंदभाई गुजराथी ,श्री.उल्हासभाई गुजराथी , शाळेचे मुख्याध्यापक श्री डी.व्ही.याज्ञिक सर , उपमुख्याध्यापक श्री आर.आर.शिंदे सर, पदाधिकारी , सर्व शिक्षक-शिक्षिका , शिक्षकेतर लेखनिक ,कर्मचारी वृंद यांनी श्री सुदर्शन महाजन यांचे कौतुक व अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button