Maharashtra

आदर्श :दोन बहिण-भावंडानी जमा केलेली रक्कम दिली कोरोना निर्मुलनासाठी

आदर्श :दोन बहिण-भावंडानी जमा केलेली रक्कम दिली कोरोना निर्मुलनासाठी

रावेर|प्रतिनिधी- शकील शेख

लहान मुलांना मिळत असलेले पैसे एका डब्यात जमा करून वाढदिवस किंवा काही सणाला सुख-चैनीच्या वस्तू,सायकल,कपडे व हौस पूर्ण करण्यासाठी या डब्यातील रक्कमेचा वापर केला जातो.मात्र या *संकल्पनेला रावेरच्या दोन* *चिमुकल्यांनी फाटा देत,जमा केलेली तब्बल अडीच हजार रुपये कोरोना लढयासाठी शासनाकडे सुपूर्द केली आहे* संपूर्ण देश कोरोना लढ्याशी लढत असतांना,आता मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे.रावेर देखील अनेक अनेक संस्था व सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे येत आहे.यात दोन चिमुकल्यांनी आदर्श घातला आहे.रावेर पालिकेचे नगरसेवक सुरज चौधरी यांचा *मुलगा अभय व मुलगी तेजस्वी दोघींनी तहसीलदार उषाराणी देवगुने यांना त्यांनी गोळा केलेल्या रकमेचा डब्बा कोरोना ग्रास्तास्च्या लढ्यासाठी देऊ केला* असता,यावेळी उपस्थित कर्मचारी प्रवीण पाटील यांनी या चिमुकल्याकडून तो डब्बा घेवून फोडल्यावर त्यातून निघालेले सुमारे अडीच हजार रुपये कोरोना लढयासाठी दान केले आहे.त्यांच्या या सढळ दातृत्वाने समाजात आदर्श उभा राहीला आहे.—-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button