Amalner

न्यायालयीन कामकाज पुर्ववत सुरू करा अन्यथा वकीलांना दरमहा १५०००/-रूपये सन्मानधन म्हणुन द्या-इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्स(आय ए एल)

न्यायालयीन कामकाज पुर्ववत सुरू करा अन्यथा वकीलांना दरमहा १५०००/-रूपये सन्मानधन म्हणुन द्या-इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्स(आय ए एल)

रजनीकांत पाटील

अमळनेर वकील संघाने एकमताने पाठींबा देऊन गेल्या ५ ते ६ महीन्यांपासुन कोर्ट कामकाज जवळ जवळ बंद असल्यामुळे वकीलांवर आर्थिक
संकट कोसळले असुन ब-याच वकीलांवर उपासमारीची पाळी आली असुन काही वकीलांनी आत्महत्त्या देखील केल्या आहेत.
म्हणुन एकतर कोर्ट कामकाज पुर्वी प्रमाणे त्वरीत सुरूकरण्यात यावे नाहीतर जो पावेतो कोर्टकामकाज सुरू करीत नाहीत तो पावेतो सर्व वकीलांना शासनाने दरमहा सन्मानधन म्हणुन रू.१५०००/-दयावेत.वगैरे मागणीचे निवेदने

१.सन्मा.मुख्य न्यायमुर्ति,मुंबई उच्च न्यायालय
२.सन्मा.प्रधानमंत्री
भारत सरकारद्वारा जिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी/तहशिलदार
३.सन्मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र
राज्य द्वारा जिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी/ तहशिलदार
४.सन्मा.अध्यक्ष,महाराष्ट्र व गोवा वकील परीषद
यांना देण्यात आली असुन
जर वकीलांच्या समस्यांबाबत कोणताच विचार करण्यात आला नाही तर मात्र आपल्या मागण्यांसाठी वकीलांना रस्त्यावर देखील उतरून आंदोलन करावे लागेल.
अशी मागणी जोर धरून आहे.
त्यावेळी अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष,शकील काझी,सचिव दिनेश पाटील तसेच वकीलांच्या हिताच्या मागण्यांसाठी सतत प्रयत्नशील असलेले सिनी.अँड.अशोक बाविस्कर, व बहुसंखेने सिनीयर्स व ज्युनियर्स वकील हजर होते. अँड.दिनेश पाटील,सचिव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button