अती वृष्टी च्या नुकसान भरपाई संदर्भात किसान काँग्रेस आणि अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना निवेदन…
आदिवासी कल्याण मंत्री के सी पाडवी यांचा काल दि. ६ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा होता. यावेळी जिल्हा किसान काँग्रेस, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी व तालुका किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेवून अमळनेर तालुक्यातील ५२ खेड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची समस्या मांडली. यावेळी त्यांना सदर मागणीबाबतचे निवेदन देण्यात आले. मागील वर्षी सन २०१९ मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यात ५२ खेड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सदर शेतकऱ्यांना मदतीबाबत दोनवेळा निर्णय घेतला गेला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली नाही. त्यामुळे सदर मागणीबाबत विचार करून पाठपुरावा करावा अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रा. सुभाष पाटील यांनी मंत्री पाडवी यांना तालुक्यातील प्रलंबित समस्या मांडली. यावेळी सोमवारी परत दूरध्वनीवर संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सोबत घेवून मार्ग काढू असेही मंत्री महोदयांनी प्रा. सुभाष पाटील यांना सांगितले. चर्चा करुन निवेदन देतेवेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृषीभूषण सुरेश पाटील, अमळनेर किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, सुलोचना वाघ, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत यासह मान्यवर उपस्थित होते.






