Nashik

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये पत्रकार दिन साजरा

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये पत्रकार दिन साजरा

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यलयात ६जानेवारी पत्रकार दिन साजरा करत वर्तमान पत्राचे तालुका प्रतिनिधी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष अनिल दादा देशमुख, अभिनव बालविकास शालेय समिती अध्यक्ष रघुनाथ गायकवाड, प्राचार्य बी जी पाटील,आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्य निरगुडे मॅडम, उपमुख्याध्यापक यु डी भरसठ, पर्यवेक्षक बी बी पुरकर, के एस वारुंगसे आदींच्या हस्ते मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, तालुका प्रतिनिधी भगवान गायकवाड, नितीन गांगुर्डे, बाळासाहेब अस्वले, संदीप मोगल, सुखदेव खुर्दळ, सुनील घुमरे, अशोक निकम, किशोर देशमुख, समाधान पाटील, विलास जमदाडे आदींचा फाईल, लेखणी व पुष्प देत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दर्पणार बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती प्रतिमा पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन श्रीम व्ही व्ही पाटील यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, विद्यालयाचे प्राचार्य बी जी पाटील , यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत कार्याचा गौरव केला.
पत्रकार सुनील घुमरे, नितीन गांगुर्डे , संतोष कथार यांनी मनोगत व्यक्त करत शालेय परिवाराचे आभार मानले.
यावेळी श्रीम पाटील व्ही व्ही यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची सरविस्तर माहिती दिली.आभार श्रीम एस जी सूर्यवंशी यांनी मानले.
फोटो- दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये पत्रकार दिनानिमित्त दिंडोरी तालुक्यातील तालुका प्रतिनिधींचा सत्कार प्रसंगी बाळासाहेब जाधव, अनिल दादा देशमुख, रघुनाथ गायकवाड, प्राचार्य बी जी पाटील, आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button