ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने भाजपचे राज्यव्यापी आक्रोश आंदोलन
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले
अशा घोषणा देत राज्य सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी औरंगाबाद, ओबीसी मोर्चाच्या वतीने “आक्रोश आंदोलन” करण्यात आले.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापु घडामोडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिलभैय्या मकरिये, ओबीसी मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे सर, दिलीप थोरात, शिवाजी दांडगे व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.






