Erandol

? Crime Dairy…एरंडोल येथील शिक्षकाचा विहिरीत आढळला मृतदेह

? Crime Dairy…एरंडोल येथील शिक्षकाचा विहिरीत आढळला मृतदेह

रजनीकांत पाटील

एरंडोल :- शहरातील मातोश्री नगर येथे वास्तव्यास असलेले व रिंगणगाव येथील रे.ना.पाटील माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला शिक्षक संदिप गोविंदा शिंगणे (वय ३९) यांचा मृतदेह १३ ऑगष्ट गुरुवार रोजी पद्मालय शिवारातील किरण रघुनाथ पाटील यांच्या शेतातील विहिरीत दुपारी १ वाजेच्या सुमारास मिळाला.

एरंडोल पोलीस स्टेशनला रोहित योगराज भोई यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवने यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ.चंद्रकांत पाटील व मिलिंद कुमावत करीत आहेत.संदिप शिंगणे यांच्या पश्चात पत्नी व आई असा परिवार आहे.ते अमळनेर येथील रहिवाशी आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button