Pandharpur

बबनराव आवताडे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यातील बैठक निष्फळ

बबनराव आवताडे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यातील बैठक निष्फळ

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा252 विधानसभा पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. समाधान आवताडे यांच्याविरोधात त्यांचेच चुलत बंधू खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे हे उभे राहिले आहेत.त्यांची मनधरणी करण्यासाठी आलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहित पाटील व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे.
मंगळवेढ्यात आज खरेदी विक्री संघावर तब्बल दोन तास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.
याप्रसंगी माजी सभापती राजाराम जगताप,दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष सूर्यकांत ठेंगील, जयंत साळे, बाबासाहेब कोंडुभैरी,विजय बुरकुल आदीजन उपस्थित होते.दरम्यान बबनराव आवताडे यांनी कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा राबविण्याच्या सूचना या बैठकीनंतर दिल्या आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विधानपरिषद आ.रणजितसिंह मोहिते पाटील हे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची मनधरणी करण्यासाठी मंगळवेढ्यात आले होते.
बबनराव आवताडे यांनी या बैठकी नंतर आपल्या कार्यकर्त्यांना अधिक जोमाने प्रचार यंत्रणा राबवण्यात सांगितल्याचे समजते.
यामुळे पंढरपूर मंगळवेढा 252 विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्यासमोरील अडचणींत वाढ होताना दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button