दिव्यांग बांधवांचे प्रतिसाद शिरोळ तालुका दिव्यांग ग्रुप
नूरखान
कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत दिव्यांग उन्नती अभियान कार्यक्रम अंतर्गत दिलेल्या तीनचाकी सायकल वाटप करण्यात आली होती. या मधील नांदणी येथील दिव्यांग भगिनीं सौ बिस्मिल अस्लम सादुले यांनी स्वता 40 टक्के अपंग व त्यांना चालता येत असल्यामुळे त्यांनी शिरोळ तालुक्यातील गरजु दिव्यांग बांधवांना दान देण्याचे महान कार्य करुण मा श्री सतीश जांगडे यांनी राबविलेल्या उपक्रमला प्रतिसाद दिला आहे.
त्यावेळी पंचायत समिती सदस्या सौ मिनाक्षी कुरडे, नांदणीचे सरपंच सौ सुवर्णा क्ष्रीरसागर, ग्रामपंचायत सदस्या सौ विद्या संकेक्ष्वरे, श्री अस्लम सादुले, श्री सतीश जांगडे यांच्या उपस्थितीत त्यांनी तीनचाकी सायकल दान दिले शिरोळ तालुका दिव्यांग ग्रुप मार्फत त्यांचे अभिनंदन केले जात आहे.






