शेळ्यामेंढ्यी चोरी आणि वन्य प्राण्यांच्या हल्लामुळे मेंढपाळ व्यवसाय धोक्यात.
संजय वाघमोडे
सुभाष भोसले
यशवंत सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या यमगे येथील मेंढपाळ मेळाव्यात यशवंतसेना कोल्हापुर जिल्हाध्यक्ष मा.संजय वाघमोडे बोलत होते अध्यक्ष स्थानी यशवंत सेना विभाग प्रमुख अमोल मेटकर, होते
यशवंत सेनेचे कोल्हापुर जिल्हाध्यक्ष मा.संजय वाघमोडे यांनी कागल तालुक्यातील यमगे येथे जाऊन धनगर मेंढपाळ बांधवाच्या समस्या जाणुन घेतल्या.यामध्ये प्रामुख्याने मेंढ्याची होणारी चोऱ्या व आजपर्यंत झालेल्या एकाही चोरीचा न लागलेला तपास तसेच पावसाळयात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने. आपल्या कुठूंबासह भटकंती करीत. उन वारा पाऊस याची परवा न करता चोवीस तास रानावनात राहत असल्यामुळे मुलांना शिक्षणही घेता येत नाही .अनेक मेंढपाळ यांचे जन्म व मृत्यू ही रानात झालेले असल्याने त्यांच्या जन्मा-मृत्यु नोंदीचे दाखले ही उपलब्ध होत नाहीत . घर किंवा जमीन खरेदी केलेली असेल तरच महसुली पुरावा उपलब्ध होतो पण.परिस्थितीच गरिबीची असल्याने जगनेच मुश्कील असल्याने. जमीन घर खरेदी कशी करणार त्यामुळे महसुली पुरावे नसल्याने शासकीय दाखलेही मिळत नाहीत त्यामुळे त्यांना जातीचे दाखलेही मिळत नाहीत. उन्हाळयात पाणी टंचाई,व उसाला तीन हजार दर झाल्यापासून संपूर्ण पडिक जमीनीचे क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली आल्यामुळॆ जास्तीत जास्त शेतीचे क्षेत्र कमी झाले त्यामुळे चराऊ कुरणे कमी झाल्यामुळे चार्याची टंचाई.निर्माण झाली आहे.आणि एखाद्या ठिकाणी शेतात शेळ्या मेंढ्या चारण्यावरून शेतकऱ्यांकडून मारहाण होत असते.तसेच रानात मारल्या जाणाऱ्या औषधामुळे रोगराई व विषामुळे आजारांचे व अचानक बकऱ्या मरणाचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात मटणाचे दरही कमी झालेचे सांगुन व्यापारी कमी दराने खरेदी करीत आहेत ते ही उधार आणि पैसे थोडे थोडेच देतात .त्यामुळे सारा मेढपाळ व्यवसायच धोक्यात आला आहे . सरकार ही या व्यवसायाला मदत करीत नाही.
एकीकडे बकरी चोरुन नेण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असताना आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये बकऱ्यांचा बळी जात आहे. बळी गेलेल्या बकऱ्यांचा पंचनामा करताना वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना प्राण्यांची लांबी रुंदी उंची आणि पशुवैद्यकीय आधिकारी यांना शवविच्छेदन करताना संपूर्ण बकऱ्यांची आवश्यकता हवी असते. पण अडचण अशी येते जेव्हा वन्य प्राणी हल्ला करतात तेव्हा कधी संपूर्ण खातात त्यामुळे थोडेच अवशेष शिल्लक राहतात तर कधी कधी एका पैक्षा जास्त बकरी मारतात निम्मे अर्धे खातात तर काहींना पळवून घेऊन जातात मग अशा वेळी पंचनामे शवविच्छेदन ला तांत्रिक अडचणी येतात आणि आधिकारी मृत बकरी समोर असल्याशिवाय पंचनामे करत नाहीत शोधून आणा म्हणून सांगतात मग मारलेल्या बकऱ्या शोधायच्या कुठे संपूर्ण खाल्ल्याने सापडत नाहीत काही वेळेला पशुवैद्यकीय अधिकारी दोन दिवस उपलब्ध होत नाहीत. तोपर्यत मारलेल्या बकऱ्या दाखविण्यासाठी ठेवायच्या कशा ? हाही प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे मेंढपाळ बांधवावर संकटावर संकट कोसळत आहे आणि जंगलात बकऱ्या शोधायला गेलेतर पुन्हा मेंढपाळांच्यावर हल्ला होण्याची भीती असते.तर वनखात्याकडे तक्रार करायला गेले कि विनापरवाना जंगलात प्रवेश केल्याबद्ल गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात.याची दखल घेऊन शासनाने समंधीत विभागांना सुचना देऊन धनगर बांधवांना मदत करावी व बंदिस्त शेळी- मेंढीपालन व्यवसाय वाढीसाठी सरकारने पीककर्जाप्रमाणे बीनव्याजी कर्ज व अनुदान उपलब्ध करून हा व्यवसाय वाढीसाठी चालना द्यावी व मेंढपाळांच्या मुलांना पदवी व पदव्युत्तर शिक्षण मोफत द्यावे व.चोरांपासुन.संरक्षण करण्यासाठी हत्यार परवाना द्यावे.अशी मागणी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली.यावेळी अमोल मेटकर, सिध्दु दिवटे यांनी ही मनोगत व्यक्त केले. दगडू डोणे यांनी मला वाघमोडे साहेब यांच्या मुळेच नुकसान भरपाई मिळाली असे सांगितले.बाजीराव बाबू दिवटे, संजय सत्याप्पा मेटकर आकाराम शेळके सिध्दू बाबू दिवटे, संजय सत्याप्पा मेटकर, संदिप सुरेश दिवटे मुरगुड तानाजी रामा डोणे, संदिप (आकाराम) बाबुराव धनगर बानगे मारुती मायाप्पा करमरे,बाणगे आनंदा वासुदेव मेटकर खडकेवाडा खानाप्पा आप्पाजी मेटकर खडकेवाडा आजुबाजुच्या भागातील धनगर समाजबांधव व.मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






