राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने बोदवड तालुक्यात CAA समर्थनार्थ तिरंगा पदयात्रा
बोदवड सुरेश कोळी
राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने बोदवड तालुक्यात CAA समर्थनार्थ तिरंगा पदयात्रा काढण्यात आली व कायदा विषयक माहिती देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते .
दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी बोदवड शहरातून समस्त तालुक्याच्या वतीने CAA कायद्याच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा पदयात्रा निघाली ज्यात जवळजवळ बोदवड तालुक्यातील 4500 ते 5000 नागरिक उपस्थित होते सदर पदयात्रेत 72 मीटर तिरंग्या ने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते तिरंगा पदयात्रेच्या माध्यमातून भारतीय ऐक्याचा संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न झाला व सभेच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रमुख वक्त्यांनी CAA कायद्यावर मार्गदर्शन केले त्यात प्रमुख वक्ते श्री सिद्धेश्वर लटपटे व अमोलजी देशमुख यांनी हे सांगितले की हा मूळ कायदा नसून है कायद्यात केलेले संशोधन आहे की यानुसार अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश या देशात धर्माच्या आधारावर ज्या अल्पसंख्याका वर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल त्यांचा धर्म प्रताडीत होत असेल त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होत असेल अशांना आपल्या देशात नागरिकत्व दिलं जाईल की जात हिंदू शीख ख्रिश्चन जैन बौद्ध यांचा समावेश आहे व हे नागरिकत्व त्यांना तेव्हाच दिले जाईल जेव्हा त्यांची या देशात राहून वास्तव्य करून सहा वर्षाचा कालावधी उलटला असेल म्हणजेच त्यांचं वास्तव्य 31 डिसेंबर 2014 पूर्वीपासून असेल व सोबत हेही सांगण्याचा प्रयत्न केला की बाकी देशातील अल्पसंख्यांकांना CAA च्या अंतर्गत बिनशर्त नागरिकत्व मिळणार नाही थोडक्यात श्रीलंका सारख्या देशांमध्ये धर्माच्या आधारावर संविधान लिहिलेले नाही. व हा कायदा आता पहिल्यांदाच मांडण्यात आलेला नाही तर हे कायद्यातील संशोधन आहे की जे वेळेनुसार पंडित जवाहरलाल नेहरू व श्रीमती इंदिरा गांधींनी देखील परिस्थितीनुसार संशोधन केले व त्यानुसार आज अमित शहा व नरेंद्र मोदींनी सुद्धा मानवता व माणुसकीच्या आधारावर सर्व धर्माला सर्व धर्मियांना न्याय मिळावा सर्वांचा धर्म सुरक्षित व्हावा म्हणून नागरिकता संशोधन बिल लोकसभा व राज्यसभेत पास केले . देशातील हिंदू व मुस्लीम हे जगाचे एकतेचे प्रतीक आहे या एकतेला काही धूर्त राजकारणी गालबोट लावून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदू व मुस्लिम या देशाचे अविभाज्य घटक आहेत त्यांना या कायद्याचा कुठलाही धोका नाही हे आवाहन सभेच्या माध्यमातून करण्यात आले
सदर CAA समर्थन कार्यक्रमात संयोजक श्री पवन संतोष माळी सहसंयोजक श्री गणेश जवरीलाल शर्मा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री गोपाल जी अग्रवाल महाकाल ग्रुप बोदवड सेवा फाउंडेशन बोदवड मातोश्री फाउंडेशन बोदवड समस्त सावता माळी समाज गोरक्षण संस्था भ्रष्टाचार निर्मूलन समिती व इतर 25 संघटनेचे योगदान व समर्थन लाभले.






