Kolhapur

रांगणा गडाने पुन्हा अनुभला एक रोमांच शिवप्रेमी मावळ्याने मोहीम केली फत्ते…

रांगणा गडाने पुन्हा अनुभला एक रोमांच शिवप्रेमी मावळ्याने मोहीम केली फत्ते…

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी रांगणा गडावरून खोल दरीत ढकलून दिलेल्या तोफांपैकी तब्बल अडीच हजार किलो वजनाची महाकाय तोफ ५२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर वर काढण्यात कागल येथील त्रिवेणी कंन्स्ट्रकशनच्या मावळ्यांनी गुरुवार अखेर यश मिळवलेच.”हर हर महादेव”,”छत्रपती शिवाजी महाराज की जय”असा जयघोष करीत,गुलाल उधळीत या मावळ्यांनी सकाळी ९ वा.रांगणा गडावर या मावळ्यांनी या तोफेची विधिवत प्रतिष्ठापना केली.१९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी हाती घेतलेली ही मोहीम १५ एप्रिल रोजी सफल संपूर्ण झाली आणि या महाकाय तोफेचा तब्बल दोन शतकाचा वनवास संपला.
शिव छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला रांगणा गड हा महाराष्ट्रातील बलाढ्य गढ म्हणून प्रसिद्ध आहे.सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेला;परंतु कोल्हापूर जिल्ह्यात येणारा हा अखेरच्या काळात ब्रिटिश्यांच्या ताब्यात होता.या काळात भविष्यात कधी तो पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात गेला तर त्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो,या भीतीपोटी ब्रिटिशांच्या या गढावाची ताकत कमी करण्यासाठी या गडावरील मोठमोठ्या तोफा गडाच्या उंच कड्यावरून खोल दरीत ढकलून दिल्या.ब्रिटिश साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला.रांगणा ही स्वतंत्र झाला;परंतु गडावरील महाकाय आणि अजस्त्र तोफा गडाखालील खोल दरीत वनवास भोगत होत्या. आज त्याचा वनवास संपला.
या मावळ्यामध्ये प्रजोत चव्हाण ओकांर वारके, सुनिल वारके, भाऊसो साठे ,नेताजी साठे, जीवन फराकटे ,चंद्रकांत वारके, रघुनाथ वारके, राहूल मगदूम, बजरंग मडवकर, निखील परीट, अवधूत पाटील, अमर सातपुते, भाऊ मगदूम, बाजीराव खापरे, सुनिल फराकटे, अरूण मगदूम, नेताजी सूर्यवंशी, तानाजी साठे, भाऊ साठे, अवधूत शिंगे, प्रथमेश पाटील याचां समावेश होता .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button