Pune

भरतगाव ( ता. दौड ) गावाचे सुपुत्र भिवा वाघमोडे झाले शहीद..

भरतगाव ( ता. दौड ) गावाचे सुपुत्र भिवा वाघमोडे झाले शहीद..

दत्ता पारेकर

पुणे 26 डिसेंबर : पुणे येथील लष्कराच्या इंजिनियरिंग महाविद्यालयातल्या CME ( college of Military engeniering) दोन जवान शहीद झाले आहेत . तर 5 जवान जखमी झाले आहेत. हे जवान दररोज सरावाचा एक भाग म्हणून प्रात्यक्षीक करत होते. त्या दरम्यान अपघात होऊन या जवानांचा मृत्यू झाला. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लष्काराच्या प्रशिक्षणासाठी देशातलं हे सर्वात महत्वाचं कॉलेज आहे. युद्ध काळात आणीबाणीच्या परिस्थितीत पूल बनवणं, लष्काराला मार्गतयार करून देणं अशी अत्यंत महत्वाची कामं या जवानांना करावी लागतात. संस्पेशन ब्रिज बनविण्याचा सराव सुरू होता. त्यात सर्व जवान व्यस्त होते.
त्याचवेळी एका बाजूला उभा केलेला टॉवर कोसळला आणि त्याखाली दोन जवान आले. सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
मृत झालेल्या जवानांमध्ये भिवा खंडू वाघमोडे (वय 28 – पोस्ट नायक) मूळचा दौंडचा राहणारे आणि संजीवन पीके (वय 29 – पोस्ट हवालदार) मूळ राहणार केरळ यांचा समावेश आहे .
शहीद भिवा खंडू वाघमोडे यांच्या वरती त्यांच्या मुळ गावी उद्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button