औरंगाबाद–जळगाव (सिल्लोड) राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ? सामाजिक कार्यकर्ते अजहर सय्यद यांचा आरोप
गणेश ढेंबरे
औरंगाबाद –जळगाव (सिल्लोड) राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगती पथावर चालू असून हे काम आर. के चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर पुणे बेस कॅम्प पाथ्री या कंपनीने घेतले असून सदर काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पत्रकानुसार पॉव्हमेन्ट क्वालिटी काँक्रीट (PQC) ऊंची (जाडी) ३०० एम.एम बंधनकारक आहे. तसेच डोवेल बार (३८/३६)एमएम चे (२६) नग वापरणे बंधनकारक आहे. तसेच मुरूम वापरणे बंधनकारक आहे. तरी संबधित अधिकारी व वरील कंपनी संगमत करून आपल्या कुशल बुध्दीने, अनुभवाने स्वता: च्या मनमानी, मर्जी नुसार काम करत आहे. पॉव्हमेन्ट क्वालिटी काँक्रीट (PQC) ३०० एम एम नसून ची ऊंची (जाडी) १४० एम.एम ते २३० एम.एम मोठ्या प्रमाणात करत आहे. तसेच डोवेल बार (३८/३६) चे एम.एम २६ नग नसून ३२ एम.एम २४ नग वापरण्यात आले. तसेच मुरूम नसून डांबराचे खराब तुकडे, मोठे दगड, पुलाचे खराब सिमेंट तुकडे, माती मोठ्या प्रमाणात हे वापरण्यात येत आहे, पुढेही असेच काम करत आहेत, पुरावे नष्ट करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. संबधित अधिकारी व कंपनीने यामध्ये मोठ्या प्रमाणात कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असून शासनाची व जनतेची आर्थिक फसवणूक करून नुकसान केले आहे. संबधित अधिकारी व कंपनी दोषी असल्याने काम थांबवून निकृष्ट कामाची चौकशी करावी. जर ८ दिवसांच्या आत संबधितावर कारवाई न झाल्यास आपल्या विभागीय आयुक्त कार्यालया समोर अन्न त्याग आमरण उपोषण करण्यात येईल. असे अजहर सय्यद यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती 1) विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद. 2) जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद. 3) अधिक्षक अभियंता स्नेह नगर कार्यालय औरंगाबाद. 4) कार्यकारी अभियंता पदमपुरा कार्यालय औरंगाबाद यांना देण्यात आल्या आहेत*






