Parola

आदर्श शिक्षकातर्फे यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणी जनांचा सत्कार

आदर्श शिक्षकातर्फे यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणी जनांचा सत्कार

कमलेश चौधरी पारोळा

पारोळा : येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांच्या तर्फे यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणी जनांचा सत्कार केशव पतसंस्था सभागृहात रविवार दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.आर्.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून वाघरे येथील डॉ सतीश भास्करराव पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य रविंद्र बोडखे यांची उपस्थिती होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनानंतर पारोळा तालुक्यातील किसान,राणी लक्ष्मीबाई व रा. का. मिश्र वरिष्ठ महाविद्यालयात मार्च २०२० च्या पदवी परीक्षेत प्रत्येक शाखेत व प्रत्येक विषयात प्रथम क्रमांकाच्या २४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० रुपये रोख बक्षीस व गौरव पत्र प्रदान करण्यात आले त्याचबरोबर इयत्ता १० वी, १२वी व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना देखील रोख बक्षीस व गौरव पत्र प्रमुख पाहुणे प्राचार्य रविंद्र बोडखे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. एकुण ३९ विद्यार्थ्यांना रुपये ६,९०० ची बक्षीसे स. ध. भावसार तर्फै व्यक्तिश: स्वखर्चाने दिली गेली.
गुणी जनांचा सत्कार
याच कार्यक्रमात टेहू येथील आय् टी आय् या खाजगी संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे नाशिक विभागातून उत्कृष्ट आय् टी आय् म्हणून गोरवण्यात आल्याने प्राचार्य एन् ए. पाटील व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु विशाखा प्रभाकर साळी हिने बी. एस् सी (भौतिक शास्त्र ) पदवी परीक्षेत ९७.२१ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केल्याने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स.ध.भावसार यांनी भावपूर्ण सत्कार केला.

कठोर परिश्रम आवश्यक !
प्रमुख पाहुणे प्राचार्य रविंद्र बोडखे यांनी तंत्र शिक्षणाविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तर सत्कारार्थी मनोगतात प्राचार्य एन्. ए. पाटील यांनी ज्ञानाबरोबर संस्कारही ग्रहण करण्याचे आवाहन केले . समारंभाचे अध्यक्ष. प्राचार्य डॉ डी आर् पाटील यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि हा उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे सांगितले.सत्कारार्थी विद्यार्थिनी विशाखा प्रभाकर साळीसह सुजाता चौधरी (जळगाव ) प्रसन्न चौधरी ( अमळनेर) रोहन कोळी ( अंबापिंप्री ) व पूनम पाटील ( राजवड ) यांनी सदर उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करुन भावसार सरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन आयोजक स. ध. भावसार यांनी तर सूत्रसंचालन पंकज भावसार यांनी केले समारभास निवृत्त तहसीलदार केशवराव वामन भावसार, प्रदीप चौधरी, जनमेजय व सौ स ई नेमाडे ( जळगाव ) मनोज भावसार ( फैजपूर ) गणेश व सुनील भावसार ( पातोंडा ता. चाळीसगाव) हिंमतराव चौधरी ( अमळनेर ) कांतीलाल भावसार ( धरणगाव ) यशवंत चौधरी, विनोद हिंदुजा राजेंद्र सोनवणे, प्रभाकर साळी ( पारोळा ) तसेच यशवंत विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अरुण व योगेश पाटील ईश्वर ठाकरे निंबा साळी दिपक पिले व सा. पु. महाजन यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button