Amalner

?️ अमळनेर कट्टा… शासकीय सुविधा अपूर्ण पडू लागल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून विविध सुविधांसाठी प्रशासनाला एक लाख रुपयांचे धनादेश प्रांताधिकारी यांच्या कडे सुपूर्द

?️ अमळनेर कट्टा… शासकीय सुविधा अपूर्ण पडू लागल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून विविध सुविधांसाठी प्रशासनाला एक लाख रुपयांचे धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

अमळनेर : शासकीय सुविधा अपूर्ण पडू लागल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून विविध सुविधांसाठी प्रशासनाला एक लाख रुपयांचे धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
अमळनेरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून गंभीर व अत्यवस्थ होण्याचे प्रमाण देखील वाढल्याने शासकीय सुविधा अपूर्ण पडू लागल्या आहेत त्यामुळे प्रांताधिकारी तथा इंसिडन्ट कमांडर सीमा अहिरे यांनी सामाजिक संस्था , दानशूर व्यक्तींना वस्तुरूपी मदतीचे आवाहन केले होते. माजी आमदार साहेबराव पाटील , रोटरी क्लब , मंगळ ग्रह संस्थान यांच्या पाठोपाठ स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी देखील जनरेटर , विविध वस्तू ने आण खर्च व इतर सुविधांसाठी एक लाख रुपये किमतीची मदत केली आहे यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे , दिलीप सैनानी ,सुरेश चौधरी , प्रफुल्ल जैन , जगदीश पाटील , प्रशांत वायकर , कमलेश वानखेडे हजर होते.
लसीकरणाची मागणी
त्याचप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांना दररोज धान्य वाटप करावे लागते आणि नोंदणी ,थम्ब लावणे , धान्य मोजणे या प्रक्रियेत विविध लोकांशी जवळून संबंध येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. यापूर्वी अनेक दुकानदार यामुळे पोझोटिव्ह देखील आले असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना विना अट प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे अशी मागणीही तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे.

?️ अमळनेर कट्टा... शासकीय सुविधा अपूर्ण पडू लागल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून विविध सुविधांसाठी प्रशासनाला एक लाख रुपयांचे धनादेश प्रांताधिकारी यांच्या कडे सुपूर्द

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button