Amalner

दिव्यांग व्यक्तींना मिळणार अंत्योदय अन्न योजनेचा लाभ

दिव्यांग व्यक्तींना मिळणार अंत्योदय अन्न योजनेचा लाभ

प्रतिनिधी : अमळनेर

प्रहार अपंग क्रांती संस्था यांच्या वतीने आज अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. दिव्यांग बंधू आणि भागिनींच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. संजय गांधी योजना, अंत्योदय अन्न योजना या वर 1 तास मिटिंग करण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींना मिळणार अंत्योदय अन्न योजनेचा लाभ

त्यावर तहसीलदार मिलिंद वाघ म्हणाले की जास्तीत जास्त लाभार्थीनी अंत्योदय अन्न योजने साठी अर्ज करावा व या योजनेत पारदर्शकता यावी या साठी आम्ही सदैव तत्पर असू यात निवेदन देतांना प्रहार अपंग क्रांती शहराध्यक्ष योगेश पवार, उपाध्यक्ष नूरखा पठाण, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्रीताई साळुंखे , प्रविण पाटील, शिवाजी शिंदे, आनंदा पाटील, मधुकर पाटील,रामदास पाटील तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button