Amalner

मारवाड मधील करण साळुंखे याची राज्यस्तरीय भरारी..

मारवड येथील करणची कबड्डीत राज्यस्तरीय भरारी…
दोंडाईचा येथे युवा कब्बडी लीगच्या चाचणीत झाली निवड…

अमळनेर :- तालुक्यातील मारवड येथील करण साळुंखे याची राज्यस्तरीय युवा कब्बडी लीगच्या निवड चाचणीत सेलेक्शन झाले आहे.
ग्रामीण भागातील युवा खेळाडूंच्या कला गुणांना वाव देण्यासाठी मुरलीधर माळी यांच्याकडून राज्यस्तरीय युवा कब्बडी लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावर एकूण बारा संघ असून या निवड झालेल्या खेळाडूंना हे संघ लिलावात विकत घेणार आहे. प्रो कबड्डी या राष्ट्रीय स्पर्धेसारखे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेची निवड चाचणी मालपुर ता. दोंडाईचा येथे पार पडली. या निवड चाचणीत चि. करण सुनील साळुंखे याने सहा वेळा डिफेन्स केले व पाचवेळा टॅकल करण्यात सफल झाला. “संपूर्ण स्पर्धेत तो सर्वात कमी वयाचा खेळाडू असून जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट खेळ करत सिलेक्ट झाला आहे.” असे आयोजक माळी यांनी करणचे कौतुक करताना सांगितले. चि. करण हा कै. रावसाहेब मोतीराम माधवराव साळुंखे यांचा पणतू, प्रभाकर रावसाहेब मोतीराम साळुंखे यांचा नातू व सुनील प्रभाकर साळुंखे यांचा मुलगा आहे. या स्पर्धेत निवड झाल्याने गावाचे व तालुक्याचे नाव राज्य पातळीवर उंचावण्याची संधी करणला मिळाली आहे. या स्पर्धेत निवड झाल्याने सर्व ग्रामस्थांकडून करण व कुटुंबीयांचे अभिनंदन केले जात असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button