Kolhapur

चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

सुभाष भोसले-कोल्हापूर
चंद्रशेखर वेंकट रामन या भौतिकशास्त्रज्ञाचा जन्म 7 नोव्हेबर 1888 तिरुचिरापल्ली येथे झाला त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. वेंकट रामन्‌ हे काही काळ बंगळुरातदेखील होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. त्यांचे संशोधन
सपूंर्ण जगात प्रसिद्ध आहे.त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) करिता ते ओळखले जातात. १९३० चेभौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक वेंकट रामन यांना मिळाले होते.चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धिसाठी पाठवला होता.

चंद्रशेखर या प्रसिद्ध भारतीय भौतीक शास्त्रज्ञाचा मृत्यू 21 नोव्हेबर,1970 रोजी झाला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button