Amalner

?️ शिरूड शेतशिवारातील विजेचा ढिसाळ कारभार शेतकरी संतप्त

शिरूड शेतशिवारातील विजेचा ढिसाळ कारभार शेतकरी संतप्त

रजनीकांत पाटील

अमळनेर :- ता शिरूड ग्रामीण भागातील सध्या विजेचा लपंडाव चांगलाच सूर आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अतिशय डोकेदुखी वाढली आहे अवघ्या पाच मिनिटां त ट्रिप होणाऱ्या मोटारीमुळे आता शेतकरी त्रासले आहेत पिकांना पाणी देण्यासाठी विजेचा अडथळा येत आहे त्यामुळे रात्री जागरण करून पाणी देण्यासाठी जावे लागते
सध्या थंडी जाणवू लागली आहे रात्री कुळकुळत अनेक शेतकरी पिकांना पाणी देत आहेत यंदा विहरींना चांगला पाणीसाठा आहे मात्र नियमित वीजपुरवठा होत नसल्याने पाण्यात उपयोग घेत नसल्याचे खंत शेतकरी व्यक्त करत आहे शेतकऱ्यांच्या विहरी शेतापासून दूर आहेत त्यात पाच पाच मिनिटांत वीज गायब होत त्यामुळे विजपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी पायपीठ करावी लागत. तसेच काही वेळा तासंतास वीज गायब होत शेतकरी वाट पाहत बसतात
विजेचे नियोजित वेळे नुसार वीज मिळत नाही रात्री ला कधी उशीरा तर दिवसा लपंडाव या मुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button