Ratnagiri

जिल्हा परिषद रायगड विरोधात बिरसा क्रांती दलाचा आंदोलनाचा इशारा..

जिल्हा परिषद रायगड विरोधात बिरसा क्रांती दलाचा आंदोलनाचा इशारा..

रत्नागिरी : जिल्हा परिषद रायगड येथे विशेष भरती मोहीम 2019 अंतर्गत शिक्षण सेवक पदभरतीत अपात्र विद्यार्थांना पात्र करून नियम बाह्य नियुक्ती आदेश दिल्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बिरसा क्रांती दल संघटनेने जिल्हाधिकारी रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रायगड-अलिबाग यांना दिनांक 10/12/2020 रोजीच्या पञाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की विशेष जिल्हा परिषद भरती 2019 अंतर्गत शिक्षक सेवक संदर्भात जिल्हा परिषद रायगड येथे ही भरती नियम बाह्य केली आहे .अपात्र विद्यार्थी पात्र केले आहेत आणि हेच विद्यार्थी सातारा,नागपूर,सांगली याठिकाणी अपात्र केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनबद्द्दल TET,CTET 2018,2019 पास असलेल्या विद्यार्थ्यांनमध्ये संभ्रम निर्माण होऊन अन्याय झालेला आहे. कारण यामध्ये सन 2018,2019.tet CTET पास आहेत .यांनी 2017 ला TAIT दिली आहे तरी त्यांची निवड केली आहे, हे नियमात बसत नाही. सगळे 2018 /19 ला tet CTET पास उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यासाठी इतर विभागाची भरती परीक्षा घेऊन केली त्याप्रकारे करावी किंवा आदिवासी शासकीय आश्रम शाळा भरती परीक्षा घेऊन झाली त्याच प्रकारे ही भरती करावी म्हणजे सर्व tet CTET पात्र धारकांना न्याय मिळेल.
अशा आशयाचे निवेदन कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी दिनांक 26/11/2020 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड व मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रायगड यांना ईमेलद्वारे दिले होते.
तरीही त्या निवेदनाकडे दुर्लक्ष करत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांनी दिनांक 08/12/2020 रोजीच्या आदेशानुसार एकूण 30 शिक्षण सेवकांना नियमबाह्य नियुक्ती आदेश दिले आहेत. हा खरे पाञ उमेदवारांवर फार मोठा अन्याय आहे. या नियुक्त्यांबाबत मोठी शंका उपस्थित होत आहे. नियुक्त्यांबाबत भ्रष्टाचारासारखा मोठा आर्थिक व्यवहार होऊन कुणाचा तरी स्वार्थ हेतू साधण्यात आलेला आहे,याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांचा दिनांक 08/12/2020 रोजीचा नियुक्ती आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा.व पारदर्शक भरती प्रक्रिया राबवून फक्त खरे पाञ उमेदवारांनाच 10 दिवसांच्या आत नियुक्ती आदेश देऊन न्याय देण्यात यावा.अन्यथा बिरसा क्रांती दल संघटना जिल्हा परिषद रायगड समोर तीव्र आंदोलन छेडेल.होणार्या परिणामास सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषद रायगड प्रशासन राहील. याची नोंद घ्यावी. असा इशारा सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी जिल्हा परिषद रायगड प्रशासनाला संघटनेतर्फे दिलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button