Aurangabad

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत अतिक्रमण जमीनदोस्त…

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत अतिक्रमण जमीनदोस्त…
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : हिमायत बाग फळ संशोधन केंद्राच्या आरेफ कॉलनी येथील जागेवरील अतिक्रमण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत आज जमीनदोस्त करण्यात आले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी आज जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट घेऊन हिमायत बाग फळ संशोधन केंद्राच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत माहिती दिली. तसेच फळबाग संशोधन केंद्राच्यावतीने अतिक्रमणाचा तपशील मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आला.
या पत्राची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष घटना स्थळाची पाहणी केली. तसेच या जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्याच्या व आवश्यकती कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. अतिक्रमण हटाव पथकाने तत्काळ कार्यवाही करत फळबाग संशोधन केंद्राच्या जागेत उभारण्यात आलेले अतिक्रमण लागलीच हटवण्यात आले. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, रवींद्र निकम, अपर्णा थेटे आदींची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button