Chalisgaon

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्या रविशंकर प्रसाद यांनी जाहीर माफी मागावी – शिवप्रेमी संघटनाची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्या रविशंकर प्रसाद यांनी जाहीर माफी मागावी – शिवप्रेमी संघटनाची मागणी

मनोज भोसले
चाळीसगाव – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणा-या केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी जाहीर माफी मागावी तसेच रामदेव बाबा यांनी सविधान विरोधात अपशब्द वापरल्याने त्याचा शिवप्रेमी संघटनानी जाहीर निषेध केला असुन यापुढे सर्व महापुरुष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांवर
गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा करावा अशी मागणी आंदोलन करण्यात येवून निवेदनाद्वारे दि २६ रोजी तहसिलदार चाळीसगाव यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रसह संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निवडणुका जिंकून सत्तेत बसायचे आणि नंतर त्यांच्याच नावाचा एकेरी उल्लेख करायचा अशा घटना सध्या नेहमी राज्यात घडताना दिसत आहेत. सोनी वाहीनीवर झालेल्या कार्यक्रमात सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता,याचा शिवप्रेमीनी जाहीर निषेध करताच महाराजांचे नाव त्यांनी सन्मानानें घेतले.या घटनेला काही अवधी उलटताच तोच
भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परीषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अनेकदा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे समस्त शिवप्रेमी व महाराष्ट्रासह भारतीय जनतेची अस्मिता दुखावली गेली. हा अवमान महाराष्ट्रातील शिवप्रेमी कदापि खपवून घेणार नसून वेळेप्रंसगी या नितीभ्रष्ट्र बिनअकलीच्या नेत्यांना धडा शिकविल्या राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्ताला देखील धडकी भरेल असे शौर्य गाजविले होते. महाराजांचा शौर्याचा इतिहास हे विसरले असतील तर पुन्हा इतिहासाची ज्वलंत मशाल पेटविल्या शिवाय मावळे स्वस्थ बसणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले.अशा छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा जाहीर निषेध केला असून त्यांनी शिवप्रेमी व समस्त भारतवासीयांची जाहीर माफी मागावी. भारतीय जनता पार्टीने त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी. असे न केल्यास शिवप्रेमी जनतेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा देण्यात आला आहे यापुढे सर्व महापुरुष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांवर
गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा करावा आंदोलन करण्यात येउन . निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे निवेदनावर गणेश पवार ,दिलीप घोरपडे ,खुशाल पाटील, शरद पाटील,भरत नवले ,ज्ञानेश्वर कोल्हे, संजय कापसे,मुकुंद पवार , समाधान मांडोळे, किरण पाटील, प्रदीप देशमुख ,सुनील निंबाळकर, दीपक देशमुख, योगेश पाटील ,मुकेश गोसावी , रोहित जाधव, प्रकाश पाटील, मनोज पाटील ,विजय जगताप, भीमराव खलाणे ,भाऊसाहेब सोमवंशी ,कैलास गावडे ,सागर धुमाळ ,, मुकेश नेतकर,विकास पवार ,कुलदीप पाटील, रवींद्र गोसावी, आकाश काकडे, समाधान बच्छाव,छोटु अहिरे ,निंबा जगताप ,प्रदिप मराठे , सुनील चौधरी ,रमेश शिंपी,अमोल देठे , शिवाजी राजपूत, सुरेश चौधरी,राहुल मोरे , शत्रुघ्न नेतकर अदिच्या सह्या आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button