Dhakani

भटकी जनावरे ठरत आहेत वाहतुकीस अडथळा

भटकी जनावरे ठरत आहेत वाहतुकीस अडथळा.

ढाणकी प्रतिनीधी गजानन तरटे

नेहमीच गर्दी असलेल्या ढाणकी येथील स्टेट बॅंक समोर भटकी जनावरे उभी राहत असल्याकारणाने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची षक्यता नाकारता येत नाही.

ढाणकी येथे स्टेट बॅंक परिसरात नेहमीच वर्दळ असते त्यामुळे बॅंकेत कामानिमीत्त आलेल्या लोकांची वाहने बॅंकेसमोर लावलेली असतात त्यात भर म्हणुन आता भटकी जनावरे भर रस्यामध्ये ठिया देवुन उभी राहत असल्याने वाहन तसेच पायदळ चालणा-या लोंकांना त्रास सहन करावा लागत आहे. बॅंके षेजारीच षासकीय गोदाम असल्यामुळे तेथे सुध्दा ट्क चे येण्ेा जाने चालु असते. मात्र रस्यात असलेल्या जनावरे व ट्क चा सुध्दा अपघात होउ शकतो.

नुकत्याच निर्माण झालेल्या नगरपंचायत पुढे या जनावरांना आळा घालने हे मोठे काम आहे ही जनावरे किराणा दुकान, भाजीपाला वाले इत्यादी च्या दुकानात घुसुन सुध्दा नुकसान करत आहेत. यांना जर मालकांनी आळा न घातल्यास सदर जनावरे कोंडवाडयात टाकण्यात येतील असे दुकानदारांचे म्हणने आहे.

Leave a Reply

Back to top button