Pune

खामगळवाडीत रंगणार महाराष्ट्र विरूध दिल्ली मल्लयुध्द..

खामगळवाडीत रंगणार महाराष्ट्र विरूध दिल्ली मल्लयुध्द..

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे– इंदापूर तालुक्यातील खामगळवाडी गावात कानिफनाथ यात्रेनिम्मित्त निकाली कुस्तीचे जंगी मैदान आयोजित केले आहे . रविवार दिनांक १५/३/२०२० रोजी दुपारी ३ वाजता मैदानाचे उद्घाटन होणार आहे त्या निमित्ताने आखाड्यावर जय्यत तयारी सुरू आहे. या मैदानावर ५००आसनक्षमतेची गॅलरी उभा करणार असल्याचे मुख्ख संयोजक पै सुनिल खामगळ पै मोतीराम खामगळ पै महेश खामगळ पै अतुल खामगळ पै दादा खामगळ यांनी ही माहिती दिली.
प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत मदने पुणे विरुद्ध जितेंद्र सिंग दिल्ली द्वितीय क्रमांकाची कुस्ती महारुद्र काळेल विरुद्ध संतोष जगताप तसेच तृतीय क्रमांकाची कुस्ती माऊली कोकाटे विरुद्ध दत्ता नरळे यांच्यात होणार आहे ..
या मैदानासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मोहळ तालुक्याचे आमदार यशवंत माने जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती प्रविण माने अभिजित तांबिले पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे देवराज जाधव दशरथ डोंगरे हेमंत वाघमोडे पाटील अशोक चोरमले विजय चोरमले पिंटु लोंढे सागर ठवरे सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मैदानावर लातुरे साहेब API यांचा प्रमुख सत्कार होणार आहे..

हे मैदान वस्ताद सचिन बनकर पै कुंडलिक कचरे यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली होणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button