Amalner

?️अमळनेर कट्टा..मारवड पोलिसांची सतर्कता आणि दरोडा टळला..! धुळ्याचे चार संशयित जेरबंद

?️अमळनेर कट्टा..मारवड पोलिसांची सतर्कता आणि दरोडा टळला..! धुळ्याचे चार संशयित जेरबंद

कार, सुरी, चाकु, मिरची पुड, कटर,जाड सुती दोर,मोबाईल हन्डसेट व इतर साहित्यासह शिताफीने पकडले आरोपी…

अमळनेर येथे दि.01-07-21 रोजी रात्रीच्या गस्तीवर असलेले सपोनि वैभव पेठकर व त्यांच्या पथकाने अमळनेर ते जळोद रोडवर अमळगाव बस स्टॅण्ड परिसरात वरील सामानासह रात्री 2 वाजून 30 मि चार आरोपी ताब्यात घेतले आहेत.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्तीवर नजर ठेवून टेहळणी करत असल्याचे दिसल्याने पथकाने त्याच्या कडे गेले.पण तो पळुन गेला यामुळे संशय बळावल्याने पुढे जावुन पाहता एक सफेद रंगाची शेवरलेट चारचाकी गाडी उभी दिसली. त्यात चार इसम 1) नईम शहा सलीम शहा 30 रा.आझादनगर 2) मोहमंद अर्शद मो.बशीर अन्सारी 29 रा.शहीद अब्दुल हमीद नगर 3) आबीद शहा पिरण शहा फकीर 26 रा.शहीद नगर 4) अतीकुर रहेमान मो.सलीम अन्सारी 37 रा.आझादनगर आढळून आले. त्यांची झडती घेता सुरा, चाकू, मिरची पावडर, कटर दोरखंड रूमाल व शेवरलेट सफेद रंगाची कार असे साहित्य मिळुन आले.यानुसार त्यांच्यावर भादंवि क.399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कारवाई व अधिक तपास सुरू आहे.
मारवड पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने पुढील संभाव्य धोका टळला असून हे सराईत गुन्हेगार आहेत व कुठेतरी दरोडा टाकण्याची तयारी होती. या बाबत सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांचे मार्गदर्शना खाली वैभव पेठकर तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button