चिमणीच्या भडक्याने आग लागली .दबापिंप्री येथील जि प शाळेच्या शेजारील दामू धोंडु सकट यांच्या झोपडीला
प्रतिनिधी :
पारोळा : पारोळा तालुक्यातील दबापिंप्री येथील जि प शाळेच्या शेजारील दामू धोंडु सकट यांच्या झोपडीला दि 11 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता चिमणीच्या भडक्याने आग लागली . त्यात संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे दिवाळीसाठी कष्टाने कमावलेले 9 हजार रूपये जळुन राख झाले होते. या आपत्तीने सकट कुटुंबीय उघड्यावर आले. या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसनेदेखिल पुढाकार घेऊन पिडीत कुटुंबीयांना एका महिन्याच्या किराण्यासह दिवाळीनिमित्त फराळ व कपडे देऊन एक सामाजिक सलोखा जपण्याचा छोटेखाणी प्रयत्न केला . जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहर उपाध्यक्ष इद्रिस बागवान , सरचिटणीस अतुल भागवत, मनिष पाटील, कुणाल पाटील, घनश्याम महाजन आदींनी मिळुन हि मदत पोहच केली .






