Ratnagiri

100% शिक्षण शुल्क वसूल करणार्यां शाळा व्यवस्थापकांवर कारवाई करा: बिरसा क्रांती दलाची मागणी. शिक्षणमंञी वर्षाताई गायकवाड व राज्यमंञी बच्चू कडू यांना निवेदन

100% शिक्षण शुल्क वसूल करणार्यां शाळा व्यवस्थापकांवर कारवाई करा: बिरसा क्रांती दलाची मागणी. शिक्षणमंञी वर्षाताई गायकवाड व राज्यमंञी बच्चू कडू यांना निवेदन

रत्नागिरी : शाळा व्यवस्थापनाकडून बडजबरीने शिक्षण शुल्क वसूली थांबवा व 50% पेक्षा अधिक शुल्क वसूल करणारे शाळा संस्थांवर कडक कारवाई करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, शिक्षण मंञी वर्षाताई गायकवाड , राज्यमंत्री शिक्षण बच्चू कडू साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या संकटाने बरेच लोक बेरोजगार झालेत.त्याच काळात शाळाही बंद होत्या. आता काही वर्ग सुरू झाले असून काही वर्ग सुरू होणे बाकी आहे. तेव्हा काही शाळेच्या संस्थापनाकडून पालकांकडून बडजबरीने नोटीसा पाठवून शालेय शुल्क वसूल केली जात आहे.काही शाळेत ही शुल्क 100% व उर्वरित शाळेत 50% पेक्षा अधिक शुल्क भरायला तगादा लावला जात आहे. फी न भरल्यास परिक्षेला बसू देणार नाही, रिझल्ट देणार नाही अशी धमकी दिली जात आहे. यामुळे पालकांवर आर्थिक बोजा टाकला जात आहे, पालकांवर दबाव टाकला जात आहे. कोरोना महामारीनंतर नऊ ते दहा महिन्यांनी शाळा सुरू झाल्या आहेत. त्या कालावधीतील वार्षिक फी,अॅक्टीवीटी फी,टर्म फी,लॅब फी इत्यादी वसूल केली जात आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी शाळेतील लॅब,प्रयोगशाळा, पाणी,वीज,खेळासंबंधीत सुविधा ,ग्रंथालय, शैक्षणिक प्रोजेक्ट उपकरणे इत्यादींचा अजिबात वापर केलेला नाही. तरी याचे शुल्क काही शाळा भरायला लावत आहेत. त्यामुळे अनेक पालक टेन्शनमध्ये असून फी भरण्याची ऐपत नाही. म्हणून यातून मार्ग काढून 50% पेक्षा अधिक शुल्क शाळा व्यवस्थापनाकडून वसूल करू नयेत,म्हणून आपल्याकडून तसे तात्काळ आदेश व्हावेत.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शिक्षण मंञी,राज्य शिक्षण मंञी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button