Nandurbar

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन सलग दुसऱ्या दिवशीही ऑपरेशन ऑल आऊट, कॉबींग /नाकाबंदी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन सलग दुसऱ्या दिवशीही ऑपरेशन ऑल आऊट, कॉबींग /नाकाबंदी

नंदुरबार फहिम शेख

मागाल काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन गटात झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली दिनांक 14/12/2021 चे रात्री नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट/ फॉबींग/नाकाबंदी राबविण्यात आले होते. ऑपरेशन ऑल आऊटचा मुख्य उद्देश हा आगामी काळात साजरे होणारे सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समजाकंटक व गुन्हेगारांवर वचक • निर्माण व्हावा असा होता.
त्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविणेबाबत नियोजन केले. आपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी, हिस्ट्रीशिटर्स, गैंग हिस्ट्रीशिटर्स, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले चोरीच्या वस्तू बाळगणारे, रात्री संशयीतरीत्या फिरणारे Drunk and Drive, कारागृहातून सुटून आलेले आरोपीतांचा शोध घेवून जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द् कायदेशीर कारवाई करणेबाबतच्या तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेच्या सुचना मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या दिनांक 14/12/2021 चे रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 44 अधिकारी व 287 अमलदार नेमण्यात आले होते व संपूर्ण ऑल आऊटचे नेतृत्व मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार यांनी स्थत करून नाकाबंदी कॉबींग ऑपरेशन / ऑपरेशन ऑल आऊट बाबत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. मा, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी,
नंदुरबार श्री. सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. श्रीकांत घुमरे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करून कारवाई करीत होते.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 36 इसम दारु पिवून वाहन चालवितांना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द् नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना मोटार वाहन कायदा कलमान्वये 36 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया ही सुरु करण्यात आलेली आहे.
चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन
आलेले 11 रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे विविध पोलीस ठाणेत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचेकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले 04 संशयीत इसमांच्या ताब्यात मिळुन आलेल्या मालमत्ते बाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याचेविरुध्द् जिल्ह्यातील विविध पालीस पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नंदूरबार शहर व अक्कलकुवा पोलीस ठाणे अभिलेखावरील फरार असलेल्या 04 आरोपीतांना देखील ताब्यात घेण्यात आले त्यांना मा. न्यायालयात पाठविण्यात आले आहे ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 25 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये 1 लाख 23 हजार 735 रुपये किमतीची देशी विदेशी दारु, वियर असा मुद्देमाल व 40 हजार रुपये किमतीची अवैध दारुची वाहतुक करणेकामी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे तसेच 23 जुगाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये 29 हजार 460 रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नवापुर शहरातील धडधड्या रेल्वे गेटजवळ महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला खाण्यास अपायकारक लाख 20 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने 7 लाख रुपये किमतीच्या चारचाकी वाहनासह मिळून आल्याने 3 आरोपीतांविरुध्द नवापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नंदुरबार शहरात अवैधरीत्या जनावरांचे मास उघड्यावर विक्री करीत असतांना मिळून आल्याने दोन्ही आरोपीतांकडुन 63 हजार रुपय किमंतीचे जनावरांचे मास जप्त करुन त्यांचे विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन-वेलेबल वॉरंटपैकी 187 नॉन वेलेबल वॉरंट व 131 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले 58 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे. तसेच नंदुरबार शहरात बस स्थानक समोर डी एस के मार्केट जवळरस्त्यावर एक इसम धारदार चाकु (सुरा) कब्जात बाळगुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन धारदार चाकु (सुरा) करुन त्याचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्हा हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेला पप्पु ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरैशी हा मा. पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांची अथवा मा. न्यायालयाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता त्याच्या राहते घरी असतांना पोलीसांना पाहुन पळुन गेल्याने त्यांचे विरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त करून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, मा. पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. रविंद्र कळमकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असून पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कॉबींग व नाकाबंदी) योजना संपुर्ण जिल्ह्यात व प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button