Maharashtra

वाळू तस्कराविरूध्द महसुल विभागाची मोठी कारवाई चार टॅक्टरसह जेशीबी मशीन जप्त

वाळू तस्कराविरूध्द महसुल विभागाची मोठी कारवाई चार टॅक्टरसह जेशीबी मशीन जप्त

लॉक डाऊन चा गैरफायदा घेत वाळू चोरांचा परंडा तालूक्यात धुमाकुळ

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

लॉक डाऊन च्या काळात सर्वत्र शुकशुकाट असल्याचा गैरफायदा घेत परंडा तालूक्यातील डोंजा येथिल नदी पात्रातुन वाळूचा बेसुमार अवैध उपसा करणाऱ्या वाळू तस्कराविरूध्द परंडा महसुलच्या पथकाने प्रशिक्षणार्थी उप विभागीय आधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वा खाली दि १ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास डोंजा येथे धाड मारून ४ टॅक्टर व एक जेशीबी मशीन जप्त केली आहे .

कोरोना व्हायरस चा प्रसार रोखन्या साठी गेल्या दिड महिन्या पासुन लॉक डाऊन करण्यात आले असल्याने महसुल विभाग व पोलिस विभाग व्यस्त असल्याची संधी साधत डोंजा येथील नदी पात्रातुन जेशीबी मशीन द्वारे राजरोस पणे बेसुमार अवैध वाळू उपसा होत असल्याने प्रशिक्षणार्थी उप विभागीय आधिकारी विवेक जॉन्सन , नायब तहसिलदार , तुषार बोरकर, नायब तहसिलदार , गणेश सुपे , मंडळ अधिकारी , हटकर , तलाठी विनोद चुकेवाड यांच्या पथकाने दि १ मे रोजी रात्री डोंजा येथील सिना , खैरी नदी पात्रात धाड मारली असता जेशीबी च्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करून टॅक्टर मधुन चोरटी वाहतुक होत आसल्याचे आढळून आले.

घटणा स्थळावरून एक जेशीबी मशीन व ४ टॅक्टर जप्त करण्यात आले आहे .

या प्रकरणी अवैध वाळु उपसा करणारे

१ ) दीपक कालिदास सुरवसे रा. गोसावी वाडी ता. परंडा जि. उस्मानाबाद चालक,

ज्ञानेश्वर गोरख लावंड रा. मिरगव्हाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर महिंद्रा टॅक्टर ६०५ डी.आय

२ ) मालक बापु गोरख कसाब रा. मिरगव्हाण तालुका करमाळा जिल्हा सोलापुर एमएच ४५ ए.डी ३७४५महिंद्रा निवा ६०५ डी.आय चालक किरण आश्रुबा सुरवसे रा.मिरगव्हाण तालुका करमाळा जिल्हा सोलापुर

३) मालक शहाजी नवनाथ हाके रा. मिरगव्हाण ता. करमाळा जि. सोलापुर चालक विजय राजेंद्र शिंदे रा मिरगव्हाण ता. करमाळा जि. सोलापुर महिंद्रा ५५५

४) मालक सचिन भास्कर लावंड रा.मिरगव्हाण ता. करमाळा जि. सोलापुर हनुमंत भागवत रोकडे रा पिसरे ता. करमाळा जि. सोलापुर महिंद्रा ५५५ एम.एच. ४५ एस.१४३५

जेसीबी मालक मेनीनाथ साहेबराव कसाब रा.मिरगव्हाण ता. करमाळा जि. सोलापुर चालक बापु गोरख कसाब ३०xTCB या सर्वाविरूध्द गुन्हे दाखल करण्याची प्रकीया सुरू आहे .

करमाळा तालुक्यातील वाळू तस्कर परंडा तालुका हद्दीत आलेच कसे त्यांचा साथीदार कोण याचा देखील तपास करून त्याच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button