Amalner

जैतपिर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेले..पोलिसांत गुन्हा दाखल…

जैतपिर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेले..पोलिसांत गुन्हा दाखल…

अमळनेर:- तालुक्यातील जैतपीट येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून
नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जैतपीर येथील 12 वी शिकत असलेली वय 17 वर्षे वयाची मुलगी 11 नोव्हेंबर रोजी आईला सायंकाळी टेलर कडे कपडे शिवण्यासाठी जावून येते असे सांगून गेली पण घरी परतली नाही. त्यावेळी मुलीचे वडील व भाऊ हे शेतात गेलेले होते. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी गावात नातेवाईकांकडे तपास केला पण मुलगी न सापडल्याने तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेल्याची खात्री झाल्यानंतर मारवड पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button