Pune

राज्यातील सर्वोच्च शिखरावर दुमदुमला शिवरायांचा जयजयकार

राज्यातील सर्वोच्च शिखरावर दुमदुमला शिवरायांचा जयजयकार

दत्ताजी पारेकर
पुणे – इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमींनी राज्यातील सर्वोच्च असणारे कळसूबाई शिखर मोहीम पुर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषने शिखर परिसर दुमदुमून गेला होता . त्यावेळी गडावर प्रसिद्ध शिवव्यक्याते डॉ लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान झाले .. समुद्री सपाटीपासून सुमारे 5400 फुट असलेले आणी पुणे अहमदनगर व नाशिक या जिल्ह्याच्या सिमेवर जहागिरीदार गावानजीक हे शिखर आहे . येथे देशभरातील ट्रेकर मोठ्या संख्येने येत असतात कळसूबाई शिखर परिसराची रचना राजगड येथील बालेकिल्ला सारखी आहे.
इंदापूर तालुक्यातील शिवभक्त परिवार व कामधेनु परिवारातील 54 सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते . निसर्गाच्या कुशीत आणी घनदाट आदिवासी पाड्यांत असलेल्या या सर्वोच्चशिखरावर एकदा तरी गेले पाहिजे या भावनेतून शिखराचे टोक या सदस्यांनी गाठले . या मोहिमेत मनोज मोरे किशोर पवार राहुल सरडे व इतर सदस्य सहभागी झाले होते.
हि मोहीम यशस्वी होण्यासाठी डॉ लक्ष्मण आसबे सर आबासाहेब रांखुडे रेवण गव्हाणे आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button