Maharashtra

स्वेरीतील शिस्तीचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा

स्वेरीतील शिस्तीचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा
प्रा.परमानंद पवार
स्वेरीज् कॉलेज ऑफइंजिनिअरिंग(पॉलीटेक्निक)तर्फे ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर- गोपाळपूर येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(पॉलीटेक्निक) मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागांतर्फे ‘युज ऑफ व्हर्चूअल लॅब फॉर इलेक्ट्रिकल मशीन्स अँड प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल’ या विषयावर सोलापुराच्या एन. बी. एन. सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाचे प्रा.परमानंद पवार यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्या कोवीड-१९मुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळेद्वारे व विविध पद्धतीने अभ्यास सुरु असून त्यासंबंधी प्रा.परमानंद पवार मार्गदर्शन करत होते. विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करून घेण्याच्या संदर्भात या कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या प्रॅक्टिकल संदर्भातील ऑनलाइन कार्यशाळेमध्ये प्रा.पवार स्वेरीविषयी गौरवोदगार काढताना म्हणाले की, ‘आदरणीय डॉ.बी.पी. रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणारे स्वेरी कॉलेज हे नावाजलेले व शिस्तीसाठी ओळखले जाणारे कॉलेज आहे. या कॉलेजमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फायदा झाला आहे.’ असे सांगून त्यांनी स्वेरी कॉलेजला शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या दोन्ही विभागातील जवळपास ३०० प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. ही कार्यशाळा स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)चे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. एस. बी. पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. आर.एम. वाडेकर यांच्या सहकार्याने समन्वयक प्रा.पी.डी.कदम, प्रा.एस. एम. घोडके, प्रा. एच.बी. वाघमारे, प्रा. पी.एस. वलटे यांच्यासह इतर सहकारी प्राध्यापकांच्या सहभागातून पार पडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button