?️ अमळनेर कट्टा…38 वर्षीय शेतकऱ्याने आज दुपारी गळफास घेऊन केली आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील खापरखेडा येथील प्रेमराज शांताराम पाटील या 38 वर्षीय शेतकऱ्याने आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आज दुपारी प्रेमराज पाटील यांनी आपली जीवन यात्रा संपविली. प्रेमराज पाटील यांना महावितरण कंपनीचे शेतातील लाईट बिल हे सुमारे 60 ते 70 हजार रुपये आले असल्याचे त्यांचे नातेवाईक व खापरखेडा येथील सरपंच सतीश पाटील यांनी सांगितले. तसेच प्रेमराज यांच्यावर सरकारी बँका, बचत गट व इतर कर्ज देखील होते असे सुमारे 5 ते 6 लाख रुपये कर्ज असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले आहे. म्हणून त्यांनी शेतातील लाईटबिलच्या विवंचनेतून व इतर कर्जामुळे आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रेमराज पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असून मुलगी 15 तर मुले एक 13 तर एक 11 वर्षांचा आहे.






