अशोक उमरतकर यांची ग्राहक न्याय परिषद जिल्हा संघटक पदी निवड
रूस्तम शेख प्रतिनिधी :-
यवतमाळ
ग्राहक न्याय परिषद संघटनेची बैठक ग्राहक न्याय परिषदचे राज्य सचिव बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते अरुण जोग यांच्या उपस्थिती मध्ये शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे होऊन जिल्हा संघटक पदी कळंब येथील अशोक उमरतकर यांची निवड करण्यात आली .
अशोक उमरतकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते असुन ते तालुक्यात विविध सामाजिक व धार्मीक संस्थेचे पदाधिकारी आहे
त्यांची जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल रुस्तम शेख, बसवेश्वर माहुरकर इत्यादींनी अभिनंदन व्यक्त केले






