?️अमळनेर कट्टा..103 वेळा रक्तदान करून युवकांमध्ये आदर्श निर्माण करणारे गणेश शिंगारे...
अमळनेर 103 वेळा रक्तदान करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या गणेश शिंगारे यांचा रेड क्रॉस सोसायटी तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी ठोस प्रहार शी बोलतांना गणेश ने सांगितले की पहिले रक्तदान 1997 ला मित्रा च्या भावाच्या अपघात झाला तेव्हा केले .त्या वेळी खूप गैर समज होते मनात परंतु काहीच त्रास झाला नाही मग पुन्हा रेडक्रॉस च्या रक्तदान शिबीर झाले. तिथेच सर्व माहिती मिळाली की रक्तदान केल्यास काहीच त्रास होत नाही, मग मात्र स्वतःचा अभिमान वाटला आणि रेग्युलर रक्तदान करायला सुरुवात केली ती आजतागायत चालू आहे. बऱ्याच वेळा काहींना रक्ताची गरज असल्याचे कळल्यावर स्वतः हुन रक्तदान केले माझे आई वडील मला नेहमीच सांगतात ईश्वराने आपल्याला नेहमीच देण्यासाठी ठेवले आहे ,दानातच पुण्य आहे हीच खरी ईश्वर सेवा ..
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही कार्य करत आहे.यापुढेही सुरू ठेवेल.
आज रेडक्रॉस सोसायटीतून कॉल आला की AB पॉझिटिव्ह
रक्त शिल्लक नाही जमेल का मी नेहमी प्रमाणे हो सांगितले व रक्तदान केले त्या वेळी माझी मोठी बहीण संगीता शिंगारे डॉ A D चौधरी माझे मित्र नरेश पाटील व रेडक्रॉस सोसायटी चे कर्मचारी उपस्थित होते.






