अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे बागुल परिवाराचा आदर्श विवाह सोहळा संपन्न
योगेश पवार
अमळनेर कोरोना या विषाणुच्या महामारीने देशासह राज्यात सर्वत्र थैमान घातल्यामुळे विवाह सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी समारंभास बंदी असल्याने या परिस्थिती वर बागुल परिवाराने मात करत घरच्या मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीने सुरक्षीत अंतर ठेवत एक आदर्श विवाह पार पाडला.
मंगरूळ येथील कै संजय बागुल यांची मुलगी व शहादा तालुका कळंबु येथील उदयभानू पाटील यांचा मुलगा यांचा विवाह तीन ते चार महिण्या पुर्वी ठरलेला होता मात्र कोरोना या आजाराने देशासह राज्यात थैमान घातल्याने शासनाने सर्वत्र संचारबंदी,व सुरक्षीत अतंर ठेवण्याच्या अटी घालून दिल्याने सार्वजनिक कार्यक्रम समारंभ घेण्यास बंदी असल्यामुळे वर व वधु पक्षाच्या कुटुंबातील जेष्ठ मंडळी यांनी एकमेकांशी चर्चा करून लग्न समारंभातील होणारा वारेमाप खर्च टाळून कोणताच वाजागाजा न करता येथील राहत्या घरी येथे दि ११ रोजी दोन्ही परिवारातील मोजके नातेवाईच्या साक्षीने सुरक्षीत अंतर ठेवत तोंडाला मास्क लावुन शासनाने घातलेले नियमाचे व अटी चे पालन करून हर्षाली व अमोल यांचा विवाह पार पाडला.
या प्रसंगी अगदी जवळचे नातेवाईक संतोष बागुल,प्रा जितेंद्र पाटील,पांडुरंग बागुल, वैभव बागुल आदी व इंजि,मोहन सूर्यवंशी.मा,जि,प सदस्य, के,डी पाटील ह्या मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला.






