Maharashtra

विजबिलांबाबतच्या ठिय्या आंदोलनास विजग्राहकांचा वाढता पाठिंबा

विजबिलांबाबतच्या ठिय्या आंदोलनास विजग्राहकांचा वाढता पाठिंबा
विजबिल भरुच नका..
जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.

प्रतिनिधी लतीश जैन

कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील वाढीव एकत्रित वीजबिले रद्द होऊन नवीन प्रत्येक महिन्याप्रमाणे वीजबिले मिळावीत, यासाठी दि.२७ जुलै २०२०,सोमवार रोजी स.११ वा. तहसील कार्यालय चोपडा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले असून जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्रीमहोदय यांच्याकडेही पाठविण्यात आले आहे.त्यानुसार ह्या ठिय्या आंदोलनास तालुक्यातील शेकडों वीजग्राहक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटुन तसेच मोबाईल वरिल व्हॉटस्अप, फेसबुकच्या माध्यमातून आपला पाठिंबा दर्शवित आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत वीजग्राहकांनी वाढीव वीजबिले भरूच नयेत, असे आवाहन ठिय्या आंदोलनाचे प्रमुख व चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगावले बु.) यांनी केले आहे.
याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनीही वाढिव विजबिलांबाबतच्या तक्रारींची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकीत वीजबिल प्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही किंवा कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही,अशी ग्वाही दिली आहे. तसेच कुणालाही चुकीचे वीज बिल भरायला लावू नये, याची दक्षता वीजवितरण कंपनीने घ्यावी, अशी सूचना ऊर्जा विभागाचे प्रधानसचिव व संचालक यांना देण्यात आली आहे.अशीही माहिती जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.
महावितरणच्या वाढिव विजबिलांबाबतचे ठिय्या आंदोलन प्रसंगी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. यासाठी सामा.पदाधिकारी मधुसूदन बाविस्कर,लखिचंद बाविस्कर, मुरलीधर बाविस्कर, सागर साेळुंके, मोतीलाल रायसिंग, भगवान वैदु ,भगवान कोळी, सुरेंद्र सोनवणे,रवींद्र सोळुंके हे परिश्रम घेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button