संपूर्ण न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार
रत्नाकर मखरे माजी नगराध्यक्ष इंदापूर..
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे-इंदापूर कचेरी समोर आश्रमशाळेच्या विविध मागण्यांसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक व सर्व कर्मचारी दि.५ सप्टेंबर २०२० रोजी कार्यालीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून .राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी बेमुदत धरणे आंदोलनास सदिच्छा भेट देऊन पाठिंबा जाहीर केलेला आहे.परंतु आमच्या संपूर्ण मागण्या मंजूर होईपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्ते माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.इंदापूर तालुक्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यु सुरू आहे.त्यास आमचा पाठिंबा आहे. परंतु ह्या दरम्यान देखील आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे. असेही शेवटी मखरे यांनी वार्तालाप करताना सांगितले.






