Amalner

Amalner: शैक्षणिक क्षेत्राला काळीमा… यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा लाचखाऊ परीक्षक ACB च्या जाळ्यात…

Amalner: शैक्षणिक क्षेत्राला काळीमा… यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा लाचखाऊ परीक्षक ACB च्या जाळ्यात…

अमळनेर येथील रहिवासी विजय गुलाबराव पाटील वय 50 वर्ष धंदा – बहिस्थ परीक्षक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रा. सिद्धिविनायक कॉलनी, घर नंबर 171, अंमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव ह्याने लाचेची मागणी- 5,600/-रु. ( दि. 02/06/2023)
केली व लाच स्विकारली- 5,000/- रुपये.( दि. 02/06/2023)
ACB ने हस्तगत रक्कम- रू 5000/- जप्त केले आहेत.

लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची पत्नी प्रियंका ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप (Bachelor of Library) ची अंतिम परीक्षा देत आहेत. सदर परीक्षेचे पेपर्स हे अमळनेर प्रताप महाविद्यालय येथे सुरू आहेत. तक्रारदार यांची पत्नी प्रियंका व त्यांच्या सोबतच्या एकूण 8 विद्यार्थ्यांना आलोसे हे पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देतात व त्यांना त्रास न देता सहकार्य करण्यासाठी आलोसे हे तक्रारदार यांचेकडे प्रत्येक विषयासाठी 100/- रू असे एकूण 9 विषयाचे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याकडे 900/- रू असे एकूण 7200/- रुपयाची लाचेची मागणी करत होते. याबाबत तक्रारदार यांनी अमळनेर येथे दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक 2/6/2023 रोजी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष तडजोडी अंती 5600/- रु ची लाचेची मागणी करून त्यापैकी तक्रारदार यांनी दिलेली 5000/- रुपये रक्कम लाच म्हणून पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे यांना रंगेहात पकडण्यात आले. म्हणून त्यांचे विरुद्ध अमळनेर पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . सदर कार्यवाहीत सापळा अधिकारी-अनिल बडगुजर पोलीस उप आधीक्षक, ला.प्र.वि.नासिक. यांनी काम पाहिले तर सापळा पथकात
राजेन्द्र गिते, संदीप बत्तिसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक ला.प्र.वि.नासिक यांचा समावेश होता.मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री.नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही करण्यात आली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो, नासिक

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button