Amalner

?️अमळनेर कट्टा…प्रशासनाचे दुर्लक्ष.. इंजेक्शन चा तुटवडा आणि त्याने गमावले आपले प्राण…!

?️अमळनेर कट्टा…प्रशासनाचे दुर्लक्ष.. इंजेक्शन चा तुटवडा आणि त्याने गमावले आपले प्राण…!

अमळनेर येथे कोरोना विषानुणे धुमाकूळ घातला आहे. जनता त्रस्त झाली आहे. प्रशासन सुस्त आहे.लोक आपले प्राण गमावत आहेत.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दवाखाने,मेडिकल सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.रेमिडी सिव्हीयर ह्या इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे.दवाखान्यात बेड उपलब्ध नाहीत तर शासकीय दवाखान्यात पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाहीत.सामान्य माणूस उपचारा अभावी मरत असल्याच्या घटना घडत आहेत. प्रशासन मात्र कोणतीही ठोस भूमिका घेण्यास तयार नाही.मरणारा मरतो,जगणारा कसातरी जगतो आणि दवाखान्यात फेऱ्या मारणारा जगत जगत मरतो अशी दारुण परिस्थिती निर्माण झाली आहे.इंजेक्शन अभावी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच शहरात घडली.याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही.

प्रशासन बाजार बंद करा, दुकाने बंद करा,शटर बंद करा,पावत्या फाडा, इतक्या केसेस पाहिजे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांवरून कार्य केले जात आहे.100 रु रोज कमवायला जाणारा मजबूर माणूस मास्क न लावल्या बद्दल 500 रु चा दंडाची रक्कम देऊ शकतो का? विशेष म्हणजे असेच साधारण लोक टार्गेट केले जातात.आकडा भरला पाहिजे बस..!केसेस दाखवा बाकी काही ही होऊ दे..अश्या किरकोळ गोष्टींमध्ये वेळ,श्रम वाया घालविले जात आहेत.त्या पेक्षा या सर्व आपत्ती काळात जनतेला विश्वासात घेऊन कोणत्या मार्गानी उपाय योजना करता येतील,इंजेक्शन चा तुटवडा कसा भरून काढता ?मुळात इंजेक्शन चा तुटवडा का भासतोय? या मागील कारण काय?बेड अपूर्ण आहेत,वैद्यकीय सुविधा अपूर्ण आहेत त्यावर काय उपाय करता येतील ? काळा बाजार कसा थांबवता येईल? अधिक गर्दीची ठिकाण कशी कमी गर्दी होईल अशी व्यवस्था करता येईल ह्या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. पण प्रशासन आपल्याच मस्तीत आहे.अमळनेर प्रशासनाला पत्रकारांच वावडं आहे..त्यामुळे अनेक वेळा थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो..!या आणि अश्या बऱ्याच गोष्टी ची चर्चा गावात सुरू आहे. अजून किती जणांचे बळी पडतील याचा काही नेम नाही..अमळनेर शहराच्या या पावन भूमीत ह्या सर्व गोष्टी घडतात आणि अमळनेर कर शांत राहून सहन करतात हे अजब च आहे..रात्री बे रात्री इंजेक्शन साठी येणारे फोन,बेड साठी वाजणारा मोबाईल.. मनात धास्ती निर्माण करत आहे.. रोगा ने मरणाऱ्या पेक्षा धास्तीने मरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. याचाच अर्थ प्रशासन कुठे तरी कमी पडत आहे.. वैद्यकीय वातावरण धोके दायक निर्माण केले जात आहे… अशी ही चर्चा सुरू आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button