पुण्यातील कोरोनाग्रस्त पोलीस बंदोबस्तात घरी रवाना..
पुण्यात सापडलेले पहिले कोरोनाग्रस्त रुग्ण हे दुबईहून आले होते.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे | जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील पहिल्या करोनाग्रस्त दाम्पत्याला डिस्चार्ज मिळाला आहे. अवघ्या 14 दिवसांमध्येच त्यांनी कोरोनावर मात केली आहे. आता या दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दाम्पत्याला रुग्णवाहीने पोलीस बंदोबस्तात घरी रवाना करण्यात आले आहे. तसेच आणखी 3 कोरोना रुग्णही बरे झाले आहेत. त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
पुण्यात सापडलेले पहिले कोरोनाग्रस्त रुग्ण हे दुबईहून आले होते. त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना करोना झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्यांना 9 मार्च रोजी नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना विलगीकरण कक्षामध्येही ठेवण्यात आले होते. आता गेल्या 24 तासांमध्ये त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात घरी सोडण्यात आले आहे.






