? Big Breaking.. पळून गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू..!!!तालुका प्रशासना बरोबर जिल्हा प्रशासन कोमात
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर कोव्हीड सेंटर मधून सकाळी पळून गेलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.आज सकाळी अमळनेर येथील कोव्हीड केअर सेंटर मधून वावडे येथील वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती पळून गेल्याची घटना समोर आली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार या वृद्धाचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.सदर वृद्धाचा मृतदेह नगपरिषद समोरील पान सेंटर जवळ आढळून आला आहे.
अमळनेर येथील कोव्हीड केअर सेंटर मधून पॉझिटिव्ह रुग्ण अनेक वेळा पळून गेल्याच्या अनेक घटना आता पर्यंत घडल्या आहेत. एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह तर पारोळा येथे रस्त्यावर काही दिवसांपूर्वी सापडला होता. आणि आता वावडे येथील एक कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध व्यक्ती पळून गेल्यानंतर मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर लॉक डावूनच्या दुसऱ्या टप्प्यात देखील येथून काही रुग्ण रेल्वे मार्गावरून पळून गेल्याची घटना घडली होती. त्याच प्रमाणे प्रशासनाच्या ठिसाळ कारभाराचे अनेक दाखले आतापर्यंत मिळाले आहेत.
वरील सर्व घटनांमुळे अमळनेर येथील कोव्हीड केअर सेंटरच्या सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा प्रशासनाचा तालुका प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नसून अधिकारी मनमानी ,बेजबाबदार प्रशासन चालवत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. प्रत्येक वेळी जिल्हा प्रशासन तालुका अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही आतापर्यंत घडलेल्या अक्षम्य चुकांवर करण्यात आली नाही. मनुष्यवधा पेक्षा कोणताही गुन्हा मोठा नसू शकतो आणि अमळनेरात तर सामान्य लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे. याकडे जिल्हा प्रशासन काय पाऊले उचलते यावर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.






