Amalner

Amalner: टॅक्सी चालक मालक संघटनेचे बेमुदत उपोषण अधिकाऱ्यांच्या सकारात्मक मध्यस्ती मुळे स्थगित..!

Amalner: टॅक्सी चालक मालक संघटनेचे बेमुदत उपोषण अधिकाऱ्यांच्या सकारात्मक मध्यस्ती मुळे स्थगित..!

अमळनेर महाराष्ट्र शासनाने महिलांना बस प्रवासात 50% प्रवास सवलत जाहीर केल्याच्या निषेधार्थ अमळनेर मेन्स टॅक्सी चालक-मालक संघटना पदाधिकारी हे दि. 23 मार्च पासून बेमुदत आमरण उपोषणा सुरू केले होते.

सदर उपोषण कर्त्या बांधवांची भेट अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच त्यांना तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो असे आश्वासित करून समजूत घातली. त्यामुळे त्यांचे मन परिवर्तन झाले आणि उपोषणकर्ते यांचे दि.23/3/2023 रोजी पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण दि. 25/03/2023 रोजी उपोषण सोडले. अर्थातच यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थे चा प्रश्न आणि नागरिक प्रवाशांचे हाल थांबले आहेत.

यावेळी अमळनेर मेन्स टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे व नायब तहसीलदार श्री. लांडगे यांना देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button