AmalnerMaharashtra

?️ अमळनेर रेड झोन होण्यामागे प्रशासन व लोकप्रतिनिधी,पत्रकार मधील असलेला दुरावा कारणीभूत नाही का..?लालफितच आहे रेड झोन मध्ये

?️ अमळनेर रेड झोन होण्यामागे प्रशासन व लोकप्रतिनिधी,पत्रकार मधील असलेला दुरावा कारणीभूत नाही का..?

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे काल अचानक पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. आधीच रेड झोन मध्ये असलेला तालुका आता ज्वालामुखी बनला आहे. सुरुवातीला 22 मार्च रोजी लॉक डावूनची घोषणा करण्यात आली. प्रशासन फक्त स्वतः च निर्णय घेत आले.या सर्व प्रक्रियेत लोक प्रतिनिधी, पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते यांना दूर ठेवत लालफितीने फुशारकी करत कोरोनाच्या सीमा पार करण्यात अपयश मिळाले नाही .लालफित आणि अति उच्च अधिकार पदाचा गर्व या मूळे लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यात दुरावा निर्माण झाला.अधिकारी हे बाहेरून आलेले असतात त्यांना स्थानिक पातळीवर लोकांची मानसिकता, सवयी ह्या स्थानिक लोकांना माहीत असतात.या पार्श्वभूमीवर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, लोक प्रतिनिधी पत्रकार यांना विश्वासात घेऊन कार्य,नियोजन,उपाय योजना राबविणे आवश्यक होते. परंतु अमळनेर शहरात लाल फित एका ठराविक सिमेत अडकल्या मुळे इतर लाल फितीही त्यातच गुरफटल्या.

तरीही पत्रकार,लोक प्रतिनिधी आप आपल्या परीने पद्धतीने फिल्ड वर कार्यरत आहे.कोणत्याही प्रकारचा संवाद किंवा समन्वय वरील सर्व क्षेत्रातील लोकां मध्ये आढळून आला नाही.

मेरी मर्जी प्रमाणे वागणाऱ्या लाल फितीने शहरातील सर्वांचे आरोग्य प्राण धोक्यात घातले आहेत.फक्त बैठकांवर बैठका घेत गेल्या दिड महिन्यात ग्राउंड पातळीवर काय शासनाच्या नियमांचा फज्जा उडविला आहे याची जाणीव देखील लाल फितीला नाही.विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरून सामाजिक कार्यकर्ते, लोक प्रतिनिधी पत्रकार यांना संपर्क केला जातो पण लालफितीशी कोणीही संपर्क साधत नाही कारण उत्तर तर व्यवस्थित मिळणार नाहीच आणि उपाय योजना ही होणार नाही याची खात्री सामान्य जनतेला गेल्या दिड महिन्यात पटली आहे.!

त्यामुळे “लाल फित” ही खरोखरच “लाल” झाली आहे आणि याचा फटका अमळनेर शहरातील नागरिकांना बसत आहे. लाल फितीने लाल रंगातून बाहेर पडून जर संवाद साधला तर कदाचित चांगले परिणाम दिसून येतील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे सर्वच विभागाच्या लालफिती रेड झोन मध्ये आहेत. आता याला जबाबदार कोण आणि कोणत्या उपाय योजना राबविल्या गेल्या पाहिजेत यासाठी खोटी फुशारकी मिरवनाऱ्या लालफितीने जर थोडा रंग बदलला तर मुळे कोरोनाला “सीमा” पार करू शकु असे अनेकांचे मत आहे…. !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button