Ratnagiri

आदिवासी कातकरी महिलेचा बलात्कार करून खून करणार्यां संशयित आरोपी रिक्षाचालकास तात्काळ अटक करून फाशी द्या: सुशीलकुमार पावरा

आदिवासी कातकरी महिलेचा बलात्कार करून खून करणार्यां संशयित आरोपी रिक्षाचालकास तात्काळ अटक करून फाशी द्या: सुशीलकुमार पावरा

गृहमंत्री व पोलीस अधिक्षक यांना निवेदन

रत्नागिरी : हेमडी येथील आदिवासी कातकरी महिलेचा बलात्कार करून हत्या करणार्यां संशयित रिक्षाचालकास तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नवीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस अधिक्षक रायगड व पोलीस निरीक्षक खालापूर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की, हेमडी येथील विटभट्टी कामगार आदिवासी कातकरी महिलेचा दिनांक 31 मार्च 2021 रोजी भरदिवसा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. सदर घटना अत्यंत निंदनीय असून माणूसकीला काळीमा फासणारी आहे.या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. घरी लग्न असल्यामुळे सदर महिला वय 42 ही आपल्या नवर्याला माजगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील विटभट्टी वरून आणण्यासाठी सकाळी 10 वाजता च्या दरम्यान रिक्षा भाड्याने घेऊन निघाली होती.दुपारी 2 च्या दरम्यान सदर रिक्षावाला विटभट्टी वर तिच्या नवर्याकडे गेला व तुला तुझी बायको न्यायला आली आहे पण तुला मालक सुट्टी देणार नाही म्हणून इथं न येता ती पुलाखाली थांबली आहे तर तू पटकन आवरून चल,असे म्हणाला. नवरा जेव्हा 100 मीटर अंतरावर पुलाजवळ पोहचला तेव्हा त्याची बायको झुडुपात मृतावस्थेत पडलेली आढळली. नवर्याने तिच्या बायकोला दवाखान्यात नेऊयात असे म्हटले .माञ मला दुसरे काम आहे म्हणत रिक्षाचालक तेथून पसार झाला. त्यानंतर विटभट्टी मालकाच्या गाडीतून दवाखान्यात नेण्यात आले. डाक्टरानी तिला मृत घोषित केले.
नवर्याने तिला हेमडी येथे गावी अत्यसंस्कारासाठी आणले.माञ गावातील महिलांनी तिला तपासले असता तिच्या अंगावरील अंतर्वस्त्रे नव्हती. साडी गुंडाळलेली दिसली. शरीराच्या गुप्तांगाला सूज आलेली दिसली. त्यावरून त्या महिलेवर बलात्कार झाल्याचे लक्षात आले . पोस्टमार्टमसाठी खालापूर आरोग्य केंद्रात नेलं तेथेही डाॅक्टर नसल्याने दिरंगाई करण्यात आली व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही उलट सदर महिला चक्कर येऊन पडली व मृत पावली म्हणून Accident death report लिहून घेतला.
पोलीसांनी एफआयआर लिहून घेण्यास टाळाटाळ केली. डिवायएसपी आल्यावर रिपोर्ट बघितल्यावर गुन्हा दाखल करून घेऊ सांगितले. माञ सामाजिक कार्यकर्ते यांच्या दबावाने अखेर गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.
पिडीतेचा मृत्यू झाल्यानंतर 24 तासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आदिवासी कधी जन्माला , कसा जन्मला व कसा मरतो याकडे प्रशासनही जाणीवपूर्वक दूर्लक्ष करते. हे या घटनेवरून दिसते.कारण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्यासाठी 18 तास तक्रारदारास वाट पाहत थांबावे लागते. पोलीस ठाण्यात आदिवासी बांधवांना नीट वागणूक दिली जात नाही. ही एक गंभीर बाब आहे.
महोदय, बलात्कार व हत्या सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा व गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणार्यां संबंधित पोलीस अधिकार्यांस सेवेतून बडतर्फ करावे,असा कायमचाच नियम करावा. जेणेकरून बलात्कार करून हत्या करणार्यां नराधामांना कठोर शिक्षा होण्यास मदत होईल व गुन्हे नोंद न करणारे, गैरकारभार करणारे पोलीस अधिकारी कायमचेच घरी राहतील व सामान्य आदिवासी जनतेला न्याय मिळण्यास मदत होईल.म्हणून आदिवासी कातकरी महिलेचा बलात्कार करून हत्या करणार्यां संशयित रिक्षाचालकास तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी. हीच नम्र विनंती. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button